खामखेडा : रब्बी पिकाच्या काढणीचे काम संपताच खामखेडा परिसरातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. पेरणी व जमिनीच्या मशागत करण्यासाठी पारंपरिक बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.दरम्यान, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरणाऱ्या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी जमिनीची मशागत बैलजोडीच्या मदतीने केली जात असे. त्यामुळे शिवारामध्ये मे महिन्यात बैलांच्या गळ्यातील गोघर-घाटीचा मंजूळ आवाज ऐकाव्यास मिळत असे. परंतु बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत टॅÑक्टरच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. त्यामुळे आता बैलांची संख्या कमी झालेली. अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसून येत आहे, तर ठरावीक कामे बैलाच्या साह्याने केली जात आहेत. त्यातच सध्या इंधनाचे भाव वाढल्यामुळे जमीन नांगरणीचे दरही वाढले आहेत. गेल्या वर्षापर्यंत एकरी पंधराशे भाव होता. चालूवर्षी त्यात वाढ होऊन दोन हजारपर्यंत गेल्याने सर्वसामान्य शेतकºयाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, तर गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होऊन लागले आहे. त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे. उन्हाळी कांद्याची काढणी होऊन भावाअभावी कांदा चाळीत साठवणूक केली आहे. अनेक शेतकरी नांगरणी, वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामात व्यस्त दिसत आहेत.दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी पावसामुळे शेतकºयांच्या हाती पिके न आल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. जरी सरकारने कर्जमाफी केली असली तरी सहकारी सोसायटी पीककर्जाचे देते की नाही, खरीप पीककर्ज दिले त्याची रक्कम अल्प असल्याने त्यात बी-बियाणे, खते, मजुरी आदींचे नियोजन होणार नाही यामुळे खर्चाचा ताळमेळ कसा सांधावा या चिंतेने शेतकरी हवालदिल झाल्याचेही पहावयास मिळत आहे.
खामखेडा परिसरात शेतकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:53 PM
रब्बी पिकाच्या काढणीचे काम संपताच खामखेडा परिसरातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. पेरणी व जमिनीच्या मशागत करण्यासाठी पारंपरिक बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठळक मुद्देशेतकरी व्यस्त । पेरणीसाठी पारंपरिक बैलजोडीला टाळत ट्रॅक्टरला प्राधान्य