द्राक्ष बागांच्या खरड छाटणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 08:17 PM2021-04-01T20:17:26+5:302021-04-01T20:18:09+5:30

सायखेडा : यंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

Accelerate pruning of vineyards | द्राक्ष बागांच्या खरड छाटणीला वेग

गोदाकाठ परिसरात सुरु असलेली द्राक्ष बागेची खरड छाटणी.

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या भीतीने मजूर गावाकडे जाण्याच्या तयारीत

सायखेडा : यंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

होळीसाठी मजूर गावाकडे गेले आहे मोजक्या मजुरांवर छाटणीची जबाबदारी पडली असून छाटणीला वेग आला आहे, शेतकऱ्यांची लगीनघाई सुरु आहेयंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

होळीसाठी मजूर गावाकडे गेले आहे मोजक्या मजुरांवर छाटणीची जबाबदारी पडली असून छाटनीला वेग आला आहे, शेतकऱ्यांची लगीनघाई सुरु आहे

एप्रिल महिना सुरु झाल्यावर खरड छाटणी केली जाते. मे महिन्याच्या मध्यन्तरापर्यंत खरड छाटणी केली जाते. मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. छाटणी करणारे मजूर हे पेठ, सुरगाणा, तालुक्यातील असल्यामुळे त्यांच्यावर शेतकऱ्यांना अवलंबुन रहावे लागते.
मागील वर्षी सर्व मजूर गावाकडे निघून गेले होते. त्यामुळे छाटणीची समस्या निर्माण झाली होती. जादा दर देऊन स्थानिक मजुरांकडून काही शेतकऱ्यांनी छाटणी केली होती. तर काही शेतकऱ्यांनी घरातील माणसांकडूनच छाटणी करुन घेतली होती.

मजुरांना सुद्धा लॉकडाऊन कधी होईल याची भीती आहे. चार पैसे मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. मागील वर्षासारखे लॉकडाऊन झाले तर, गावसोडून कामासाठी येता येत नाही आणि कुटुंब कसे चालवावे ही समस्या समोर उभी रहाते म्हणून चार दिवसात जास्तीत जास्त पैसे पदरात पाडून घेण्यासाठी जोरात काम सुरु आहेत.
अनेक शेतकऱ्यांना खरड छाटणीसाठी आत्ताच मजूर मिळणे अवघड होत आहे. गावात मोजक्या मजुरांचे गृप शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी काम उरकून घेण्यासाठी धडपड करत आहे. खरड छाटणी ही द्राक्ष शेतीतील महत्वाची प्रक्रिया आहे, ती वेळेत होणे गरजेचं आहे, उशीर झाल्यावर काडी पक्वतेसाठी अडचणी येतात म्हणून लवकरात लवकर छाटणी होण्यासाठी शेतकरी आग्रही असतात.

पुढील वर्षाच्या फळधारणेच्या प्रक्रियेसाठी द्राक्ष बागेची खरड छाटणी अतिशय महत्वाची असते, द्राक्ष विक्री झाल्यानंतर झाडावरील जुनी काडी छाटून नवीन फुटणाऱ्या काडीमध्ये सबकेन करून फळधारणा केली जाते.
 

Web Title: Accelerate pruning of vineyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.