वटार परिसरात पेरणीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:36+5:302021-07-05T04:10:36+5:30

बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरींच्या पाण्यावर पेरण्या केल्या; पण काही मका उगवला तर काही उगवलाच नाही. त्यातच मक्यावर ...

Accelerate sowing work in Watar area | वटार परिसरात पेरणीच्या कामांना वेग

वटार परिसरात पेरणीच्या कामांना वेग

Next

बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरींच्या पाण्यावर पेरण्या केल्या; पण काही मका उगवला तर काही उगवलाच नाही. त्यातच मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. सुरुवातीपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके आता कीटकनाशक औषधांची फवारणी करूनही नियंत्रण मिळवता येत नसल्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखायचा कसा, या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. लष्करी अळीच्या वाढता प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मका पीक हे कमी खर्चीक पीक म्हणून ओळखले जाते. त्याच्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित असून, जनावरांच्या चाऱ्यासाठी कडब्याचा मोठा उपयोग होतो. पण सुरुवातीपासूनच अळीच्या विळख्यात सापलेला मका पीक शेतकऱ्यांना रडवणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

फोटो- ०४ वटार कृषी

040721\04nsk_16_04072021_13.jpg

फोटो- ०४ वटार कृषि 

Web Title: Accelerate sowing work in Watar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.