पराभूतांकडून पराभव मान्य
By admin | Published: May 17, 2014 12:30 AM2014-05-17T00:30:05+5:302014-05-17T00:46:12+5:30
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर त्या पक्षाने आघाडी सरकारच्या अपयशावर खापर फोडत टीका केली, तर पराभूत पक्षांच्या शहराध्यक्षांकडून जनतेचा कौल मान्य करीत मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे सांगितले.

जनमताचा कौल मान्यच
देशभरातील जनतेने दिलेला कौल मान्यच करावा लागणार आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. मोदी लाटेचा परिणाम होताच त्यात जनतेलाही बदल हवा होता. त्यातूनच हा कौल आला आहे तो मान्य केलाच पाहिजे; पण शहराचा विकास करूनही पराभव झाला हे धक्कादायकच.
- शरद कोशिरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष
मतदानातून व्यक्त केला राग
आघाडी सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारीला जनता कंटाळली होती. राज्यातही तीच अवस्था आणि शहरात भुजबळ यांचा भ्रष्टाचार व गंुडगिरीची नाशिककरांना किळस आली होती. तो सर्व राग मतदानातून व्यक्त झाला आहे. जनतेसमोर भाजपाच्या माध्यमातून मोदी यांचा पर्याय होता. मोदी यांनीही जनतेला विश्वासात घेत जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील.
- लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी