स्वीकृत नगरसेवक पदी सुराणा,अहेर देवळा :देवळा नगरपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:08 PM2020-03-16T14:08:25+5:302020-03-16T14:08:53+5:30
देवळा :- येथील देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी डॉ .रमणलाल सुराणा तसेच प्रा.शंकर उर्फ बंडू नाना अ हेर यांची निवड करण्यात आली . नगरपंचायतीच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी दत्तात्रेय शेजुळ यांच्या अध्यक्षतेखाली नविनर्वाचित स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली .
ठळक मुद्देयावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर , नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर , उपनगराध्यक्ष अतुल पवार , नगरसेवक जितेंद्र आहेर अशोक आहेर , बाळासाहेब आहेर , ललिता भामरे , शिला आहेर , शिंधुबाई आहेर ,प्रदीप आहेर,केदा वाघ ,मुख्याधिकारी संदीप भोळे आदिंसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते .