पाचोरे वणी फाट्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:44+5:302021-09-23T04:17:44+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पाचोरे वणी शिवारात बुधवारी ( दि.२२) महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. त्याचा ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पाचोरे वणी शिवारात बुधवारी ( दि.२२) महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. त्याचा अंदाज मारूती ओमिनी कारचालकाला न आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उलटून अपघात झाला. त्यात एकाच कुटुंबातील नऊ जण जखमी झाले असून, महामार्ग प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे हा अपघात घडल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबत अधिक माहिती अशी की, मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येणारी ओमनी कार (क्रमांक एम एच १५.जी एफ ०४०२) ही पाचोरे वणी शिवारात येत असताना महामार्गावर साचलेल्या पावसाचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे कारवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला उलटली. कारमधील ९ सदस्य एकाच कुटुंबातील असून, सर्व राहणार सटाणा तालुक्यातील सौंदाने आणि कंधाणे येथील रहिवासी आहेत. सर्व जखमींना तत्काळ जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थाची मोफत रुग्णवाहिकेतून पिंपळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
इन्फो
अपघातातील जखमींची नावे
सुनंदा खंडू मोरे (३६) , खंडू अर्जुन मोरे (४०), राहुल दगा माळी (३०), सर्व जण राहणार मु पो सौंदाने ,ता. सटाणा,तर भागाबाई सोनु मोरे (७०), ललीता समाधान मोरे (३०), कुसूम प्रताप मोरे (६०), प्रताप सोमा मोरे (४५) , अवनी समाधान मोरे(२), प्राची समाधान मोरे , (१) सर्व जण राहणार सटाणा तालुक्यातील कंधाणे येथील रहिवासी आहेत.
फोटो- २२ सटाणा ॲक्सीडेंट
220921\22nsk_50_22092021_13.jpg
फोटो- २२ सटाणा ॲक्सीडेंट