पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर बुधवारी (दि.१८) पहाटेच्या सुमाराला गुजरात परिवहन मंडळाची बस व आयशर ट्रक यांच्यात अपघात झाला. सुदैवाने बसमधील ४० हून अधिक प्रवासी बचावले. या अपघातात आयशर ट्रकचालक किरकोळ गंभीर झाल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले.अपघाताचा थरार परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गुजरात राज्यातील परिवहन मंडळाची गुजरात-शिर्डी बसला (जीजे १८, झेड ५१११) दिंडोरीरोडने दिंडोरी नाक्याकडे येताना तारवालानगर चौफुलीवर हिरावाडी लिंकरोडने पेठरोडकडे जाणाºया एका आयशर ट्रकने (एमएच १४, जीयू ६८६०) जबर धडक दिली.अपघातात दुभाजकासह सिग्नलही तुटलाधडकेनंतर आयशर दुभाजकावर बसविण्यात आलेल्या सिग्नलवर जोरात जाऊन आदळला त्यामुळे दुभाजक तूटला व सिग्नलही वाकला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये महिला पुरु ष व लहान मुले असे ४० हून अधिक प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान, या अपघातात आयशर ट्रकचालक किरकोळ गंभीर झाला, असे पोलिसांनी सांगितले.
तारवालानगर चौकात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:43 AM