संसाराचा डाव कोलमडून पडला तरी अशाही परिस्थितीत संकटावर मात करीत रोहिणी टाकळकर-जोशी यांनी खंबीरपणे पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वत:चा संसार तर सावरलाच, परंतु ज्या महिलांवर अचानक संकट कोसळले, अशा सर्वच महिलांचेदेखील समुपदेश करण्याचे कार्य टाकळकर-जोशी या गेल्या दोन तपापासून करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पती निधनानंतर आपल्या नावापुढे ‘सौभाग्यवती’ अक्षरे कायम ठेवली. त्यासाठी समाजाच्या टीकाटिप्पणीची पर्वा केली नाही. समाजात महिलांना कायमच सन्मान मिळावा आणि संकटातही त्यांनी धैर्याने तोंड द्यावे यासाठी त्या जणूकाही नवदुर्गेप्रमाणे कार्यरत आहेत.मुळात सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केले. तसेच गरीब मुलांना मोफत शिकविण्याचे काम हाती घेतले. त्यांना वाचन, लेखनाची आवड असल्याने कविता लेखनही करीत. अनेक साहित्य संमेलनांत सहभाग घेतला. याशिवाय अभिनय, सूत्रसंचालन करीत असताना अन्य महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दु:ख बाजूला सारत समुपदेशनाचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:38 AM