वाचन संस्कृतीला चालना देण्याचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:40 AM2019-10-01T01:40:20+5:302019-10-01T01:40:49+5:30
साधारणत: महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे.
संस्था परिचय
साधारणत: महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या मंडळाची स्थापना १९८१ मध्ये करण्यात आली, तर १९८५ मध्ये मंडळाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या मंडळात सुमारे ४0 ते ८0 वयोगटाच्या महिला आहेत. मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत दर महिन्यातून दोन वेळा मंडळाची सभा घेण्यात येते. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच चैत्रोत्सव, शारदोत्सव, नवरात्रोत्सव आदी सण, उत्सव साजरे करण्यात येतात. महिला मंडळाच्या अध्यक्षा वैदेही काशीकर, उपाध्यक्षा सारिका सोनजे आहेत. कोषाध्यक्ष मंजू मोराणकर, सचिव रत्नप्रभा भणगे, वाचनालय अध्यक्ष साधना गोखले, ग्रंथकोषाध्यक्ष शशी मुरुमकर, सदस्य मंजू खाडीलकर, पुष्पलता कुलकर्णी, संध्या पगार, योगिनी कीर्तने, पुष्पलता कुलकर्णी, सीमा आडकर, स्नेहा चोळकर, स्रेहल ओक, मनीषा नाईक, मनीषा टकले, रश्मी देशपांडे, प्रतीभा कुलकर्णी आदींचा समावेश आहे.
ग्रंथालयाचा उपक्रम
स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या वतीने १९८३ मध्ये वाचनालयाची स्थापना करण्यात आली. तसेच २00३ मध्ये वाचनालयाची नोंदणी करण्यात आली असून, वाचनालयाला ‘ड’ दर्जा मिळाला आहे. सुरुवातीला वाचनालयात ५0 पुस्तके होती. वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे चार हजार पुस्तके आहेत. वाचनालयाच्या वतीने वक्तृत्व अभिवाचन, कार्यशाळा स्पर्धा आदी उपक्रम वाचकांसाठी राबविण्यात येतात. त्यातून वाचकांचे आचार-विचार समृद्ध होतात.