वाडीवऱ्हे : येथील गावठाण भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या गाळे धारकांना तहसील कार्यालयाकड़ून अनधिकृत बिनशेती असल्या कारणाने दंड आकारणी करिता नोटिसा बजावण्यात येऊन कारवाई करण्यात आली.इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी सदर नोटिसा मंडलाधिकारी, तलाठी यांच्या मार्फ़त गाळेधारकांना बजावल्या होत्या. महसूल दिला नसल्याचे सांगत तलाठी व मंडल अधिकारी यांनी गाळ्यांना सील करण्याची कार्यवाही केली. काही व्यावसायिकानी आठ दिवसाच्या आत महसूल भरु अशी लेखी लिहून दिले. त्यांना आठ दिवसांत पैसे न भरल्यास कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, कोरोनामुळे आधीच व्यावसायिक अडचणीत असताना महसूल विभागाकडून वसुलीसाठी तगादा लावून कारवाई केली जात असल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी महसूल मंत्र्यांशी चर्चा काढून याप्रकरणी तोडगा काढणार असल्याचे म्हटले आहे.
वाडीवऱ्हेत थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 7:25 PM
वाडीवऱ्हे : येथील गावठाण भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या गाळे धारकांना तहसील कार्यालयाकड़ून अनधिकृत बिनशेती असल्या कारणाने दंड आकारणी करिता नोटिसा बजावण्यात येऊन कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देमहसूल दिला नसल्याचे सांगत तलाठी व मंडल अधिकारी यांनी गाळ्यांना सील