गुन्हेगारांच्या हालचालींविरुद्ध नांगरे पाटलांचा 'ऍक्शन प्लॅन'; पाच गुंड तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:39 PM2020-03-13T13:39:37+5:302020-03-13T13:40:39+5:30

शहर परिमंडळ-२ कार्यक्षेत्रातील  घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या 5 गुंडांना पोलीस आयुक्तांनी तडीपार केले आहेत.

Action plan of anchorage panels against the movement of criminals; Five goons | गुन्हेगारांच्या हालचालींविरुद्ध नांगरे पाटलांचा 'ऍक्शन प्लॅन'; पाच गुंड तडीपार

गुन्हेगारांच्या हालचालींविरुद्ध नांगरे पाटलांचा 'ऍक्शन प्लॅन'; पाच गुंड तडीपार

Next

नाशिक : शहर परिमंडळ-२ कार्यक्षेत्रातील  घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या 5 गुंडांना पोलीस आयुक्तांनी तडीपार केले आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 'ऍक्शन प्लॅन' आखला असून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे.  

सातपूर पोली स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरी करणारा गुन्हेगार संशयित रोहन उर्फ रोहित सुनील बल्लाळ, (वय - १९, रा… सातमाउली मंदिरामागे) अंबड पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे इमरान गुलाम सैय्यद (वय २१ रा. बजरंगवाडी, विल्होळी), नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे करणारे गुन्हेगार संशयित सौरभ संजय निकम, (२१, रा. त्रिशरण नगर, सिन्नरफाटा), अमोल बाळासाहेब शेजुळ (वय - २४, रा.उपनगर), सागर सुरेश म्हस्के, (२३, रा. जयभवानी रोड) अशा ५ गुन्हेगार इसमांविरुद्ध नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार उपायुक्त विजय खरात यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (3) (ब) प्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार आदेश पारीत केलेले आहे.

Web Title: Action plan of anchorage panels against the movement of criminals; Five goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.