मनपाचे भूखंड परस्पर विक्रीप्रकरणी होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:31+5:302021-01-08T04:44:31+5:30
शहरातील खासगी कत्तलखान्यांबाबत रक्तमिश्रित पाणी बाहेर येणे, गोवंशाची कत्तल होणे, बांधकाम परवानगी, फायर ऑडिट व अटी-शर्तींचा भंग केला जात ...
शहरातील खासगी कत्तलखान्यांबाबत रक्तमिश्रित पाणी बाहेर येणे, गोवंशाची कत्तल होणे, बांधकाम परवानगी, फायर ऑडिट व अटी-शर्तींचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी (दि. ५) सकाळी अपर पाेलीस अधीक्षक खांडवी, आयुक्त कासार, प्रांताधिकारी शर्मा यांनी शहरातील ३ खासगी व महापालिकेच्या कत्तलखान्यांची पाहणी केली. या वेळी कत्तलखान्यांमध्ये कुठल्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत. शासनाने दिलेल्या परवानगीनुसारच कत्तलखान्यांचे कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. मात्र बेकायदेशीर काम आढळल्यास कारवाई करण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
इन्फो
कब्जा करून उभारली घरे
महापालिकेच्या सर्व्हे क्रमांक १७६ मधील ६.९७ हेक्टर क्षेत्र ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असताना या ठिकाणी काही लोकांनी परस्पर महापालिकेच्या मालकीची जमीन विक्री केल्याचे आढळून आले आहे. जमिनीचा कब्जा करून घरे उभारण्यात आली आहेत. असाच प्रकार स. क्र. ९८/२ ब मधील १ हेक्टर ६८ आर क्षेत्रावर झाला आहे. महापालिकेचा भूखंड परस्पर विकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आयुक्त कासार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
===Photopath===
050121\05nsk_35_05012021_13.jpg~050121\05nsk_36_05012021_13.jpg
===Caption===
फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०२ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील दरेगाव भागातील खासगी कत्तलखान्याची तपासणी करताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त दीपक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०३ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील कत्तलखान्यांची पाहणी व मनपा भूखंडांवरील अतिक्रमणाबाबत माहिती देताना आयुक्त दीपक कासार. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.~फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०२ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील दरेगाव भागातील खासगी कत्तलखान्याची तपासणी करताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त दीपक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०३ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील कत्तलखान्यांची पाहणी व मनपा भूखंडांवरील अतिक्रमणाबाबत माहिती देताना आयुक्त दीपक कासार. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.