प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार दोन महिन्यांत मुंबई-नागपूर समृद्धीसाठी जागेचे संपादन : मोपलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:34 AM2017-12-30T01:34:43+5:302017-12-30T01:35:44+5:30

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकºयांचा विरोध मावळत चालल्याने दोन महिन्यांत जागेचे संपादन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

The actual work will be commenced in two months between Mumbai and Nagpur, editing of land for prosperity: Moppal | प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार दोन महिन्यांत मुंबई-नागपूर समृद्धीसाठी जागेचे संपादन : मोपलवार

प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार दोन महिन्यांत मुंबई-नागपूर समृद्धीसाठी जागेचे संपादन : मोपलवार

Next
ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या कामाला गती कामाचा अधिकाºयांकडून आढावा जमिनीसाठी शेतकºयांनी संमती

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकºयांचा विरोध मावळत चालल्याने येत्या दोन महिन्यांत राज्यातील जागेचे संपादन पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठी रस्ते महामंडळाची सज्जता झाली आहे. आगामी तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी माहिती महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण मोपलवार यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी रस्ते विकास महामंडळाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर लगेचच मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाला गती दिली असून, शुक्रवारी त्यांनी नाशिक जिल्ह्णाला भेट देऊन नाशिक व नगर जिल्ह्णातील समृद्धी कामाचा अधिकाºयांकडून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात ३९२ गावांमध्ये ८४३१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, त्यापैकी ३११३ हेक्टर जमीन म्हणजे ३७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापोटी २८०० हजार कोटी रुपये मोबदला शेतकºयांना देण्यात आला आहे. आणखी ४७९९ हेक्टर जमिनीसाठी शेतकºयांनी संमती दिली आहे. शेतकºयांमध्ये जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत असलेला संभ्रम दूर होऊ लागल्याने ते स्वत:हून जमीन देण्याची तयारी दर्शवित असून, काही ठिकाणी किरकोळ विरोध होत असला तरी, त्यांच्याशी संवाद साधून व त्यांचे प्रश्न समजावून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकºयाच्या बॅँक खात्यावरच पैसे जमा होत असल्यामुळे त्यांचा विश्वास बसू लागल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या दोन महिन्यांत समृद्धीसाठी संपूर्ण जमीन संपादित करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या असून, त्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मोपलवार म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे अवघ्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात आला होता. ते पाहता, रस्ते विकास महामंडळाची सारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, मुदतीत प्रकल्प पूर्ण होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यावेळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, महेश पाटील, राहुल पाटील यांच्यासह नगर जिल्ह्णाचे अधिकारी उपस्थित होते.
नाशिक कनेक्टिंगच्या सूचना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला नाशिक कनेक्ट करण्याचे ठरविले असल्याने नेमक्या कोणत्या ठिकाणी रस्ता कनेक्ट करता येईल याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मोपलवार यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. या आराखड्यानंतर समिती पाहणी करून ते निश्चित करेल.

Web Title: The actual work will be commenced in two months between Mumbai and Nagpur, editing of land for prosperity: Moppal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.