‘तळे राखील तो चव चाखील’ पाणी टॅँकर मंजुरीला राजकारणाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:49+5:302021-09-14T04:16:49+5:30

नाशिक : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणारा ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांकडून कितीही टाहो फोडला जात असला, तरी राजकीय व्यक्तींकडून जोपर्यंत ...

Adding politics to water tanker approval | ‘तळे राखील तो चव चाखील’ पाणी टॅँकर मंजुरीला राजकारणाची जोड

‘तळे राखील तो चव चाखील’ पाणी टॅँकर मंजुरीला राजकारणाची जोड

Next

नाशिक : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणारा ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांकडून कितीही टाहो फोडला जात असला, तरी राजकीय व्यक्तींकडून जोपर्यंत टॅँकरची मागणी होत नाही, तोपर्यंत शासकीय यंत्रणेकडून टॅँकर मंजूर होत नसल्याने ग्रामस्थांसाठी येणाऱ्या पाण्याच्या टॅँकरवर स्थानिक राजकारण्यांचाच सर्वाधिक हक्क राहिला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न एकदा कायमचा सुटावा, यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न केला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस होणाऱ्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो. पावसाचे पाणी साठविण्याचे माध्यम नसल्याने सर्वाधिक पाऊस पडूनही उन्हाळ्यात या तालुक्यांमधील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दरवर्षी या तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.

-----------

टॅँकरचे पाणी कोणासाठी

दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने शासनाकडे टॅँकरसाठी प्रस्ताव दाखल करावा लागतो. मात्र, टॅँकरने पाणी पुरवठा करणे हा सर्वात शेवटचा पर्याय असल्याने तत्पूर्वी अन्य माध्यमातून गावातील पाण्याचे स्रोत शोधण्याचा व त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या योजनांचे पुनरूज्जीवन केले जाते.

---

पाण्याचा टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असले, तरी गावपातळीवरून तसे प्रस्ताव दाखल करावे लागतात. मात्र, त्यासाठी राजकारण्यांची मदत घेतल्याशिवाय या प्रस्तावांची तालुका व जिल्हा पातळीवर दखल घेतली जात नाही. आमदार, खासदार, मंत्र्यांच्या शिफारशीनेच टॅँकर मंजूर केले जातात. त्याचा खर्च मात्र शासनाच्या तिजोरीतून होतो.

------------

टॅँकरचे पाणी मुरते कुठे?

गावासाठी दरवर्षी पाण्याचा टॅँकर मंजूर करण्यासाठी शासन दरबारी खेपा माराव्या लागतात. ही मागणी केल्यानंतर महिनाभरात टॅँकर मंजूर होतो. त्यातही टॅँकरचालक गावात शिरल्यावर लोकप्रतिनिधीच्या घरासमोर टॅँकर रिकामा करतो.

- समाधान देवरे, स्थानिक ग्रामस्थ

-------------

पाण्याचा टॅँकर दरवर्षीच लागतो. त्याचे पाणीही पुरेसे नसते. दररोज टॅँकर मंजूर असला, तरी टॅँकरचालक दोन दिवसाआड खेपा मारतो. त्यामुळे पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. मात्र, काही लोकांना पाणी वाटप करताना झुकते माप दिले जाते.

- गंगाधर, वरगळ, स्थानिक ग्रामस्थ

--------------

जिल्ह्याला लागणारे टॅँकर व खर्च

२०१८ -

२०१९ -

२०२० -

२०२१ -

Web Title: Adding politics to water tanker approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.