नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.स्वच्छता ही मातृसृष्टीची सेवा असून स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन मध्ये गावाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर काम करुन गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नाशिक येथे आलेल्या केंद्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका, महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन यांनी बोरटेंभे ग्रामपंचायतीला भेट दिली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापन सनियंत्रण गणेश वाडेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी लता गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अरुण बरोका यांनी गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील आणि स्वच्छाग्रही यांच्याशी संवाद साधून गावातील स्वच्छते विषयक करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेतली. तसेच सहसचिव अभय महाजन यांच्यासमवेत त्यांनी गावातील वैयक्तिक घरगुती स्वच्छता सुविधेची पाहणी केली. कुटुंबातील तरुण व वृद्ध व्यक्तींशी त्यांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर, शौचालय बांधकाम प्रकार व बांधकामाचे वर्ष याबद्दल माहिती घेतली. याबरोबरच गावातील ग्रामस्थांनी त्यांना हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.कोरोनाविषयक राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन गावामध्ये एकालाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ दिला नसल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी बोरटेंभे येथे तांत्रिक कारणामुळे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत संस्था स्थापन केली गेली नसली तरी सर्व ग्रामस्थांनी एकीने स्वच्छताविषयक उद्दीष्टे, घरगुती नळ कनेक्शन, भूमिगत सांडपाणी यावर काम करुन उदीष्टपूर्ती केली असल्याचेही सांगितले.
पेयजल व स्वच्छता विभाग अतिरिक्तमुख्य सचिवांची बोरटेंभे गावाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 9:53 PM
नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
ठळक मुद्देगावातील वैयक्तिक घरगुती स्वच्छता सुविधेची पाहणी केली.