नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:52 AM2018-04-16T00:52:00+5:302018-04-16T00:52:00+5:30
येवला : येवला पालिका कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघटनेने येवला पालिकेसमोर १६ एप्रिल रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या मागण्यांसाठी येवला तहसीलदार नरेश बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नेते व नगरपालिका प्रशासन, नगरसेवक यांच्या बैठकीचे आयोजन करून या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

नगरपालिका सफाई कर्मचाºयांना श्रमसाफल्य योजनेंतर्गत घरे द्यावीत, अनुकंपा तत्त्वावर कर्मचारी भरती करावी यांसह कर्मचाºयांच्या प्रलंबित सहा मागण्याबाबत न.पा. प्रशासनास संघटनेने १४ एप्रिल रोजी याबाबत निवेदन दिले होते. तसेच संघटनेने १६ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर येवला तहसीलदार नरेश बहिरम, माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, नगरसेवक, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांची पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांना नगरपालिका सेवेत सामावून घेण्यासाठी आठ दिवसांत कार्यवाही करून त्यांना अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका देणार असून, सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेअंतर्गत घरे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सफाई कामगारांच्या घरांच्या प्रस्तावाबाबत बैठक घेऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी यावेळी दिले.