येवल्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 06:11 PM2021-01-17T18:11:45+5:302021-01-17T18:12:08+5:30
येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापूर, अंगणगाव, बोकटे या चर्चित ग्रामपंचायत निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापूर, अंगणगाव, बोकटे या चर्चित ग्रामपंचायत निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दहा टेबलवर एकाचवेळी मतमोजणी प्रक्रिया चालणार असून, मतमोजणीसठी ४० निवडणूक निर्णय अधिकारी, १० मतमोजणी पर्यवेक्षक, १० सहायक, २० मदतनीस कर्मचारी असणार आहेत.
मतमोजणीच्या सात फेर्या होणार आहेत. पहिल्या फेरीत सातारे, मुखेड, सोमठाणदेश, धामणगाव, अंगणगाव, डोंगरगाव, कोटमगाव खुर्द, निमगाव मढ, अंदरसूल, देशमाने, दुसर्या फेरीत जळगाव नेऊर, नगरसूल, आंबेगाव, सायगाव, आहेरवाडी (लहित, जायदरे, हडप सावरगाव), खामगाव, नागडे, उंदिरवाडी, अनकुटे (सावखेडे), धामोडे, तिसर्या फेरीत मुरमी, खरवंडी, विसापूर, पन्हाळसाठे (पिंपळखुटे ३रे) , अनकाई, ठाणगाव, राजापूर, पिंपळखुटे बुद्रूक, तळवाडे (कौटखेडे), बाभुळगाव खुर्द, चौथ्या फेरीत पाटोदा, देवठाण, नांदुर, खिर्डीसाठे, गुजरखेडे, साताळी, ममदापूर, बोकटे, अंगुलगाव, महालखेडा (पाटोदा), पाचव्या फेरीत भाटगाव, नेऊरगाव, गणेशपुर, रेंडाळे (न्याहारखेडे बुद्रूक, खुर्द), खैरगव्हाण, धुळगाव, भारम, देवळाणे, वाघाळे, वडगाव बल्हे, सहाव्या फेरीत पिंपळगाव लेप, पुरणगाव, आडगाव रेपाळ, कोळगाव (वाईबोथी), विखरणी, एरंडगाव बुद्रूक, रहाडी, भुलेगाव, सत्यगाव, मातुलठाण, तर सातव्या फेरीत कोळम बुद्रूक ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.
पहिल्या पंधरा मिनिटांत पहिला निकाल हाती येईल, तर दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली.
येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात ८ ग्रामपंचायतींसह १८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी ८४.३४ टक्के मतदान झाले. ४३ हजार ६३३ महिला व ५० हजार ९९२ पुरुष असे एकूण ९४ हजार ६२५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
६१ ग्रामपंचायतींच्या १८५ प्रभागाच्या ४६४ जागांसाठी १००९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहेत.