निफाड तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 06:44 PM2020-08-17T18:44:55+5:302020-08-17T18:45:23+5:30

सायखेडा : आॅगस्ट महन्यात सरपंचपदाची मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतिवर प्रशासकीय अधिकार्यांची अखेर प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Administrator Raj on 62 gram panchayats in Niphad taluka | निफाड तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज

निफाड तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज

Next
ठळक मुद्दे एकाच अधिकाºयाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा कारभार दिल्याने कार्यभार सांभाळताना प्रशासकाची तारांबळ उडणार आहे,

सायखेडा : आॅगस्ट महन्यात सरपंचपदाची मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतिवर प्रशासकीय अधिकार्यांची अखेर प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीवर अखेर म्हणून पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांचे विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक प्रमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायतीवर गावातील प्रशासक म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड करावी शासनादेश अगोदर असल्याने आला होता, त्यामुळे अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते, या सर्वांचा हिरमोड झाला आहे.
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून आॅगस्ट महिन्यात संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कोणाची नेमणूक करावी यासंदर्भात खलबते सुरू आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार वेगवेगळे आदेश काढले होते. त्यात अनेकांनी या आदेशांना चुकीचा ठरवत कोर्टात धाव घेतली होती. राज्यपालांनी अनेकदा वेगवेगळे निर्णय पारित केले. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कोणाची नेमणूक करावी यावर अखेर पडदा पडला असून निफाड तालुक्यातील संपत असलेल्या ६२ ग्रामपंचायतीवर पंचायतसमिती अंतर्गत येणाºया शिक्षण, आरोग्य, कृषी, बालविकास, लघुपाटबंधारे असे विविध विभागांच्या विस्तार अधिकारी तसेच पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारी वाढणार ?
या नेमणुका करतांना प्रशासनाने एकाच अधिकाºयाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा कारभार दिल्याने कार्यभार सांभाळताना प्रशासकाची तारांबळ उडणार आहे, एक अधिकारी अनेक ग्रामपंचायतीना वेळ कसा देणारा हा महत्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकता. त्यामुळे भविष्यात प्रशासक ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध होत नसल्याच्या तक्र ारी भविष्यात ग्रामस्थ करू शकतात.
या ग्र्रामपंचायतीवर आता प्रशासक.....
रौळस, आहेरगाव, भुसे, दारणा सांगवी, देवगाव, गोंडेगाव, काथरगाव, रानवड, शिरवाडे वाकद, शिरवाडे वणी, नैताळे, रसलपुर, सोणेवाडी, सुंदरपुर, टाकळी विंचूर, वनसगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव, दात्याने, दावचवाडी, गाजरवाडी, कारसूल, खेडलेझुंगे महाजनपूर, मुखेड, खेरवाडी, ओझर, दिक्षी, बेरवाडी, सावरगाव, शिवडी, सोनगाव, वाहेगाव, वावी, बेहद, कोठुरे, म्हाळसाकोरे, खेडे, कोळगाव, शिरसगाव नांदूर खुर्द, नंदूरमध्येमशवर, रु ई, पिंप्री, मुखेड, भरवस, पिंपळगाव नजीक, लासलगाव, उगाव, सुभाषनगर, सायखेडा, पिंपळगाव निपाणी, सावळी, करंजगाव, चापडगाव, आंतरवेली, उंबरखेड, वडाळी नजीक, वाहेगाव, विंचूर,

 

Web Title: Administrator Raj on 62 gram panchayats in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.