नवीन कर्ज धोरणांचा अवलंब करावा : खरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:01 PM2020-09-05T23:01:27+5:302020-09-06T01:03:38+5:30
सटाणा : सटाणा मर्चण्ट्स को-आॅप. बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासामुळे बँकेच्या ठेवीमध्ये वाढ होत असताना आगामी काळात बँकेने कर्ज वितरणासाठी विशेष परिश्रम घेऊन नवीन कर्ज धोरणांचा अवलंब करावा, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी केले.
Next
ठळक मुद्दे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी बॅँकेच्या कामकाजाची पहाणी करून आर्थिक आढावा
सटाणा : सटाणा मर्चण्ट्स को-आॅप. बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासामुळे बँकेच्या ठेवीमध्ये वाढ होत असताना आगामी काळात बँकेने कर्ज वितरणासाठी विशेष परिश्रम घेऊन नवीन कर्ज धोरणांचा अवलंब करावा, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी केले.
सटाणा मर्चण्ट्स को-आॅप. बँकेस जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी बॅँकेच्या कामकाजाची पहाणी करून आर्थिक आढावा घेतला. यावेळीसमको बँकेचे चेअरमन कैलास येवला यांच्या हस्ते जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन कैलास येवला, प्रकाश सोनग्रा, रूपाली कोठावदे, देवीदास बागडे उपस्थित होते.