दत्तक मुलाने आईला सोडले मरणाच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:46+5:302021-06-30T04:10:46+5:30
सिडको : पोटचा पोरगा नसला म्हणून काय झालं, आईच्या मायेने सांभाळ करीत लहानाचा मोठा केलेला दत्तक मुलगा म्हातारपणीचा आधार ...
सिडको : पोटचा पोरगा नसला म्हणून काय झालं, आईच्या मायेने सांभाळ करीत लहानाचा मोठा केलेला दत्तक मुलगा म्हातारपणीचा आधार होईल या अपेक्षेने जीवन जगणाऱ्या ७२ वर्षीय आईला त्याच निर्दयी मुलाने मरणाच्या दारात सोडल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार सिडकोत घडला.
सिंहस्थनगर भागातील रहिवासी भागिरथीबाई उडपी या गेल्या दोन दिवसांपासून घरात पाय मोडलेल्या अवस्थेच एकाच ठिकाणी अन्नपाण्यावाचून निपचित पडून होत्या. घरातून आवाज येत नसल्याचे पाहून शेजारील महिलांनी घरात डोकावून पाहिले असता आजीबाई मरणासन्न अवस्थेत आढळून आल्या. मरणाच्या दारात सोडून दत्तक मुलगा निघून गेल्याचे कळवळून सांगणाऱ्या या आजीबाईंची आर्तता पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावले.
म्हतारपणी सांभाळ करण्याचे स्वप्न दाखवून आईचे घर स्वत:च्या नावावर करवून घेत तिला मरणाच्या दारात सोडणाऱ्या या निर्दयी मुलाचा प्रताप ऐकून सारेच थक्क झाले. घरात एकटीच असलेली आई जिवंत आहे का? अशी चौकशी करण्यासाठी तो मित्राला फोन करीत असल्याचे वेदनेने व्याकूळ झालेल्या मातेने सांगितले तेव्हा कठोर काळजाच्या दत्तक मुलाचा संतापजनक प्रताप समेार आला.
--इन्फो=
शेजाऱ्यांनी निभावले नाते
आजीची ही करुण काहाणी ऐकून साऱ्यांचीची मने हेलावली. शेजारील महिलांनी नगरसेविका किरण दराडे, बाळा दराडे यांना घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेत लागलीच तिला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्याची तयारी केली. त्यांनी आजीला खासगी दवाखान्यात दाखल करीत त्यांच्या उपचारावरील खर्च उचलला. अन्नपाण्यावाचून घरातच पडून राहिलेल्या आजीला वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. परिसरातील संतोष काकडे, दीपक गामने, सुनील शेलार, आनंद घुगे व विकी सांगळे यांनीही शेजारधर्म निभावत माणुसकीचे नाते जपले.
===Photopath===
290621\29nsk_36_29062021_13.jpg
===Caption===
दत्तक मुलाने आईला सोडले मरणाच्या दारात