अवकाश संशोधन, संरक्षण क्षेत्रातील चांगल्या कामगिरीचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:40 AM2019-05-27T00:40:46+5:302019-05-27T00:41:13+5:30
आपल्या देशात केंद्र शासनाच्या धोरणानुसार अवकाश संशोधन आणि संरक्षण विभाग एकमेकांना आणि परस्परपूरक आहेत, असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र ...
आपल्या देशात केंद्र शासनाच्या धोरणानुसार अवकाश संशोधन आणि संरक्षण विभाग एकमेकांना आणि परस्परपूरक आहेत, असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत अवकाश संशोधन आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचे दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणून या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास टाकलेला दिसतो. संरक्षण, संशोधन विकास संस्था आणि इस्त्रो या दोन्ही संस्थेमार्फत भारताच्या संपूर्ण संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम यांनी या दोन्ही संस्थांमध्ये कार्य केले आहे. भारताच्या संरक्षण आणि अवकाश संशोधन क्षेत्राकडे सर्व जगाचे लक्ष असते. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या ‘इनिंग’साठी रशिया, चीन, कोरिया आदी देशांच्या राष्टÑप्रमुखांनी अभिनंदन केले आहे. तसेच भारताने जागतिक पातळीवर वारंवार आंतरराष्टÑीय दहशतवादी विरोधाचा मुद्दा मांडला, त्यालादेखील युनोच्या कायमस्वरूपी सदस्य असलेल्या बड्या राष्टÑांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाच वर्षांत वेगवेगळ्या विदेश दौºयात पंतप्रधान मोदी यांचे जगातील अनेक देशांत जोरदार स्वागत झाले. विशेषत: तेथील भारतीयांनी त्यांच्या भाषणास मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आता निवडणुकीबद्दल तेथील परदेशी भारतीयांना मोठी उत्सुकता होती. भारताने गेल्या पाच वर्षांत ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अणुशक्ती या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. साहजिकच युवक आणि महिला वर्गाने त्याचे स्वागत केले.
अपूर्वा जाखडी