धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:07 PM2020-09-07T23:07:49+5:302020-09-08T01:27:19+5:30

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक्याने केला कहर... अण् शेतीचा गेला बहर अशी अवस्था सध्या नायगाव खो-यातील शेतक-यांची झाली आहे.

Adverse effects of fog on kharif crops and rabi seedlings | धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम

धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम

Next
ठळक मुद्देऐन बहरात आलेले पीक विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातच सडु लागले आहे.


नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक्याने केला कहर... अण् शेतीचा गेला बहर अशी अवस्था सध्या नायगाव खो-यातील शेतक-यांची झाली आहे.
संपूर्ण पावसाळा संपत आला तरी नायगाव खो-यात अजून एकही जोरदार पाऊस पडला नाही.परिणामी खो-यातील सर्वच बांधारे व नदी-नाले आजही कोरडेठाक आहे.अशा परस्थितीत शेतक-यांनी कमी पाण्यावर थोड्याच क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली आहे.हे पीक रिमझिम पावसावर व महागडी खते,बियाणे तसेच किटकनाशके मारून आजपर्यंत तग धरून आहे.सध्या हे सर्वच पीक ऐन बहरात आले आहे.मात्र गेल्या तीनचार दिवसांपासून नायगाव खो-यात धुक्याने कहर केला आहे.त्यामुळे ऐन बहरात आलेले पीक विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातच सडु लागले आहे.
सध्या पडत असलेल्या धुक्यामुळे खरिपाच्या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.त्यात या पिकांवर करपा,पिवळ तसेच काढणीला आलेल्या पिकांवर डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे.विशेषतः रब्बीच्या कांदा रोपांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे.
चौकट - गेल्या चार दिवसांपासून दररोज येणाऱ्या धुक्यामुळे परिसरातील कोबी,फ्लावर,टमाटे,मिरची आदीसह विविध भाज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.दररोज येणाऱ्या धुक्यामुळे पिकांवर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना महाड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे.
चौकट - यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या लाँकडावून च्या भीतीने शेतक-यांनी कमी प्रमाणात भाजीपाला केला.परिणामी भाज्यांचे बाजारभाव कडाडले.कधी नव्हे यंदा शेतकऱ्यांना दोन पैसे कमवण्याची वेळ आली होती.मात्र या दररोज येणाऱ्या धुक्याच्या कहरामुळे हा भाजीपाला शेतातच सडु लागला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
फोटो ओळी - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या चार दिवसांपासून अशा प्रकारे दाट धुके पडत आहे.या सतच्या धुईमुळे खरिपा बरोबर रब्बीच्या रोपांवरही विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

Web Title: Adverse effects of fog on kharif crops and rabi seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.