नांदगाव : महामंडळात कार्यरत संघटनांनी पुकारलेला बंद शासनाच्या मध्यस्थीमुळे मागे घेतला जाऊन बसेस सुरू झाल्या असत्या. परंतु भाजपच्या स्थानिक हस्तक्षेपामुळे गेले चार दिवस बससेवा बंद पडल्यामुळे ऐन दिवाळीत शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या आदेशाने शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे आणि गुलाब भाबड यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी नांदगाव बसस्थानक येथे धडक देऊन संपकरी कर्मचाऱ्यांना विनंती करत पोलीस संरक्षणात बसेस सुरू केल्या. आंदोलानानिमित्ताने सेना भाजप आमने-सामने आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपला दणका दिला.दिवाळी आणि भाऊबीज या काळात प्रवासी संख्या वाढते. तोट्यात असलेल्या महामंडळाला कमाईचे साधन म्हणजे दिवाळी असते. त्याचवेळी सुरू झालेली बससेवा बंद पडली. सामान्य नागरिकांची अडवणूक झाली. तरीही काही कर्मचाऱ्यांचा विरोध असताना शिवसेना स्टाईलने सर्व शिवसैनिकांनी त्यांना सामाजिक भान ठेवण्याची जाणीव करून दिली आणि कोणीही बसची अडवणूक केल्यास शिवसैनिक सेनास्टाईलने त्याला विरोध करेल, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर बसस्थानक व्यवस्थापकांना विनंती करून बस सुरू करण्यास सांगितले असता त्वरित बस सुरू करण्यात आली. नांदगाव, मालेगाव, नांदगाव सावरगाव आणि नांदगाव औरंगाबाद यातील बस पहिल्या टप्प्यात सुरू झाल्या. सोबतच प्रत्येक बस लगेच सुरू करत असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. याप्रसंगी बस सुरू झाल्याने प्रवाशांनी आभार मानले. आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार झालेले शिवसेना स्टाईल आंदोलन यशस्वी झाले. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे गुलाब भाबड, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, युवा तालुकाप्रमुख सागर हिरे, युवा शहर प्रमुख मुजम्मिल शेख, आरपीआयचे कपिल तेलुरे, शशी सोनवणे, बापू सोनवणे, नितीन सोनवणे, आरिफ शेख, सद्दाम शेख, गणेश इप्पर, पंकज चेहरे, परवेज पठाण, भरत पारख उपस्थित होते.भाजपचा दावाआंदोलनात सामील भाजपचे संजय सानप यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा हवाला देऊन एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती दिली. आगारातील ५० टक्के कर्मचारी आपल्यासोबत असून १२७ आगारातून सध्या पाठिंबा मिळाला असल्याचा दावाही केला.आंदोलन सुरू ठेवायला आमची हरकत नाही; पण कायदा सुव्यवस्था हातात घ्याल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणालाही अडचण होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घ्यावी.- अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक
सेना स्टाईल आंदोलनानंतर नांदगावी सुरू झाली लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2021 10:43 PM
नांदगाव : महामंडळात कार्यरत संघटनांनी पुकारलेला बंद शासनाच्या मध्यस्थीमुळे मागे घेतला जाऊन बसेस सुरू झाल्या असत्या. परंतु भाजपच्या स्थानिक हस्तक्षेपामुळे गेले चार दिवस बससेवा बंद पडल्यामुळे ऐन दिवाळीत शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या आदेशाने शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे आणि गुलाब भाबड यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी नांदगाव बसस्थानक येथे धडक देऊन संपकरी कर्मचाऱ्यांना विनंती करत पोलीस संरक्षणात बसेस सुरू केल्या. आंदोलानानिमित्ताने सेना भाजप आमने-सामने आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपला दणका दिला.
ठळक मुद्देभाजपला सेनेचा दणका : आमदारांच्या आदेशानंतर शिवसैनिकांची कार्यवाही