अडीच महिन्यानंतर गजबजली मालेगावची बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:55 PM2020-06-05T22:55:32+5:302020-06-06T00:01:52+5:30
राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन फेज दोन अंतर्गत शहरात प्रतिबंधित क्षेत्रा-व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील दुकाने काही निर्बंधांसह सुरू करण्यात आली असून, सुमारे अडीच महिन्यांनंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत काही भागात गर्दी केली तर काही भागात तुरळक लोक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले.
मालेगाव : राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन फेज दोन अंतर्गत शहरात प्रतिबंधित क्षेत्रा-व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील दुकाने काही निर्बंधांसह सुरू करण्यात आली असून, सुमारे अडीच महिन्यांनंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत काही भागात गर्दी केली तर काही भागात तुरळक लोक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले.
शहरात एकमेकासमोरील दुकाने सम व विषम तारखांना सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत खुली झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडावर मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवल्याचे दिसून आले तर अजूनही काही जण मास्क वापरत नसल्याचेही चित्र दिसून आले. शहरातील मोसम पूल भागातील लोढा मार्केट आणि संगमेश्वरातील बाजारपेठा ओस पडून होत्या.
किदवाई रस्त्यावर प्लॅस्टिक कागद घेण्यासाठी काही शेतकरी दिसले. सराफ बजेट, भांडी बाजार, सरदार चौक, महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर लोक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. अगदीच तुरळक मालेगाव शहरातील बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.