बीवायके महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्राचार्यांना घेराव, स्नेहसंमेलनासाठी घेतली आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:49 PM2018-01-09T16:49:32+5:302018-01-09T17:00:24+5:30

बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला.

The aggressive role played for the gathering and fondness of the students of the Byaik College | बीवायके महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्राचार्यांना घेराव, स्नेहसंमेलनासाठी घेतली आक्रमक भूमिका

बीवायके महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्राचार्यांना घेराव, स्नेहसंमेलनासाठी घेतली आक्रमक भूमिका

Next
ठळक मुद्देस्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिकासांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोधप्राचार्यांकडून संमेलनाच्या आयोजनाचे आश्वासन

नाशिक  : स्नहेसंमेलन म्हटले की महाविद्यालयीन तरुणाईच्या उत्साहाला उधान येते. परंतु, बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली असून हे संमेलन घेण्याची तयारी दाखवल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात काही दिवसांपर्वी घटलेल्या अनपेक्षित घटनांमुळे वाढलेला तणाव व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसंबधीच्या दु:खद घटनांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे प्रतिनीधी व माजी सचीव भूषण काळे यांच्यासह कमलेश काळे, तेजस कुमावेत, रिद्धी भावसार, प्रणाली शंकपाळ, प्राची वाघमारे, अनुजा सुराणा आदि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध करीत आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.

यापूर्वीही अशाप्रकारे तणावपूर्ण घटना घडल्या असून वेगवेगळ्य़ा दुख:द प्रसंगांमध्येही गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची व त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा अखंडीत पणे सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातू विद्याथ्र्याना त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. परंतु, हे व्यासपीठच हिरावून घेण्याचा घाट महाविद्यालय प्रशासनाने घातल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच स्नेहसंमेलन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातल्याने अखेर महाविद्यालयाने वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.12) हे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे होणार संमेलन
नाशिकसह राज्यभरात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. त्याचप्रमाणो महाविद्यालयाशी संबधीत कर्मचाऱ्याविषयी दुख:द घटना घडल्याने प्रशासनाने संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विद्यार्थ्यांनी खुपच आग्रही भूमिका घेऊन संमेलन शांततेत पार पाडण्याचे आश्वसान दिले. त्यामुळे नियमतपणे संमेलन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. -धनेश कलाल,प्राचार्य, बीवायके महाविद्यालय 

Web Title: The aggressive role played for the gathering and fondness of the students of the Byaik College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.