नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे, तसेच पशूखाद्याचे दर दुपटीने झाल्याने दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला असल्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी तसेच पशूखाद्यांच्या किमतीत कपात करण्यात यावी यासाठी इगतपुरी तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याची तयारी केली मात्र त्याआधीच दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.या आंदोलनासंदर्भात घोटीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांना निवेदन देण्यात आले होते. सदर आंदोलनकर्ते रविवारी (दि.८) घोटी येथील महामार्गावर आंदोलनासाठी जमले व आंदोलन सुरु असतांना दूध उत्पादक मालक भारत मुसळे यांनी दुध उत्पादकांच्या मागण्या मान्यता करून दूध दर वाढवून दिल्याने सदर आंदोलन लगेचच स्थगित करण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या आधी एका फॅटला ५ रु पये ७० पैसे असा भाव मिळत होता. परंतू दूध उत्पादक मालकांनी आंदोलनाचा धोका लक्षात घेऊन एका फॅटला ६ रु पये ६० पैसे असा सुधारित भाव दिला असून पशूखाद्यांच्या दरामध्ये देखील लवकरच कपात करण्यात येईल असे आश्वासन मुसळे यांनी दूध उत्पादक शेतकºयांना दिले.या आंदोलनात इगतपुरी तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष नितीन गव्हाणे, शिवाजी शिंदे, ज्ञनेश्वर कोकणे, बाळु पोरजे, रोहीदास रायकर, भारत माळी, काळु गव्हाणे, राजु मांडे, पंकज माळी, ज्ञानेश्वर माळी, काळु म्हात्रे, रामदास दुभाषे, प्रकाश गायकवाड, रेवणनाथ सोनवणे, गोविंद शिंदे, देविदास कडू, गणेश कडू, समाधान शिंगोटे, उमेश गव्हाणे आदींसह तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व दुग्धव्यवसायिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:30 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे, तसेच पशूखाद्याचे दर दुपटीने झाल्याने दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला असल्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी तसेच पशूखाद्यांच्या किमतीत कपात करण्यात यावी यासाठी इगतपुरी तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याची तयारी केली मात्र त्याआधीच दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी एकवटले