कळवण/पाळे खुर्द/सायखेडा : गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. अशोक मोतीराम पाटील यांच्या चार ते पाच एकर ऊस बेणे प्लॉट झालेला असताना त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने ऊस वाहून गेला तर काही ऊस गाळाने व रेतीने भरलाआहे.भास्कर शिवराम पाटील यांच्या चाळीमध्ये पाणी शिरल्याने ७०० क्विंटल कांदा पाण्यामुळे सडला. ७०० क्षमता असलेल्या चाळीमध्ये दहा फुटापर्यंत पाणी होते. दीड एकर टमाटा पिकाचा प्लॉट त्यावर साधारण दीड लाख रुपये खर्च केलेला तो पुरामध्ये वाहून गेला. नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांचे जमिनीत असलेली पाइपलाइन व ठिबक सिंचनची वाट लागली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गोदाकाठी शेतकरी हवालदिलसायखेडा : गोदावरी नदीला आलेल्या महापुराने झालेले नुकसान हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या आणि नुकसान पाहून नागरिक हैराण झाले आहे. शेती आणि व्यवसाय यांचे सर्वाधिक फटका बसला आहे. गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, चाटोरी, दारणासांगवी, शिंपी टकळी, गोदानगर, चापडगाव या गावात पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या शेतात पाणी गेल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.४पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर अनेक पिके शेतात तग धरून उभी असली तरी जास्त दिवस पाण्यात राहून आणि जमिनीत अनेक दिवस ओलावा राहिल्याने पिके सडू लागली आहे. अनेक पिकांचे शेतात अस्तित्वदेखील शिल्लक राहिले नाही. कोणत्या शेतात कोणते पीक उभे होते याच्या केवळ खुणा दिसत आहे. शेतकरी नदीचे पाणी कमी झाल्याने शेतात जाऊन पहात आहे तर उभे पीक डोळ्यासमोर गेल्याने हवालदिल होत आहे, शेतकरी या अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी जळूनखाक झाली होती तर हंगाम सुरू होताच खरीप हंगामातील पिके उभे केली. हजारो रु पये खर्च करून पिके शेतात डोलू लागली असताना गोदामाईच्या कुशीत वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
गिरणाच्या पूरपाण्यामुळे शेती संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:26 AM
गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते.
ठळक मुद्देकळवण तालुका : ७०० क्ंिवटल कांदा सडला; मक्यासह उसाला फटका