सटाणा : बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी सोमवारी (दि.८) राजीनामा दिला आहे. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे.बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी गेल्या वर्षभरापूर्वी राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सेनेचे कान्हू अहिरे यांना संधी दिली होती. आवर्तनानुसार अहिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्याकडे सादर केला. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपाचे अशोक अहिरे, रामदास सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजपा आणि सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. अतुल अहिरे, ज्योती अहिरे हेदेखील प्रबळ दावेदार मानले जात असून ऐनवेळी काँग्रेसचे सूर्यवंशी आणि सेनेचे अहिरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.भाजपच्या गळाला काँग्रेस सदस्य?अहिरे यांनी राजीनामा दिल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असून, भाजपचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. दावेदारांची संख्या मोठी असली तरी भाजपच्या गळाला काँग्रेसचा सदस्य लागल्याने भाजपा सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहे.
बागलाण पंचायत समितीचे उपसभापती अहिरेंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 11:18 PM
सटाणा : बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी सोमवारी (दि.८) राजीनामा दिला आहे. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देआवर्तनानुसार निर्णय : इच्छुकांच्या हालचाली गतिमान