हवाई प्रवास १ जुलैपासूनच शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:35+5:302021-06-06T04:11:35+5:30
नाशिक- गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर नाशिकमधील ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसऱ्या ...
नाशिक- गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर नाशिकमधील ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसऱ्या लाटेमुळे ही सेवा ठप्प झाली. सध्या ट्रु जेटची केवळ नाशिक-
अहमदाबाद सेवाच सुरू आहेत अन्य बहुतांश सेवा १ जुलैपासूनच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र शासनाची उडान येाजना नाशिककरांना लाभदायी ठरली. नाशिकमधून ट्रु जेट अहमदाबादची सेवा देत असून, स्पाईस जेट कंपनीच्या दिल्ली, बंगळूर,हैदराबाद अशा सेवा सुरू आहेत, तसेच एअर अलाईन्सच्या हैदराबाद, पुणे आणि
अहमदाबाद अशा तीन सेवा आहेत, तर स्ट्रार एअरवेजने चालू वर्षीच नाशिक बेळगाव सेवा सुरू केली हेाती. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दळणवळणाची साधने ठप्प झाली हेाती. त्यानंतर रेल्वे माफक प्रमाणात सुरू असल्याने विमान
सेवेला प्रचंड प्रतिसाद वाढला हेाता. फेब्रुवारी महिन्यात तर सर्वाधिक १७ हजार प्रवाशांनी एका महिन्यात विमानाने प्रवास केल्याची नेांद झाली होती. नाशिक जिल्ह्यात मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच आणखी काही सेवा नाशिकमधून सुरू होणार होत्या. २८ मार्चपासून स्पाईस जेटच्यावतीने कोलकता सेवा सुरू करण्यात येणार होती. विशेष म्हणजे ही सेवा सुरू करण्यासाठी उडान योजनेचा आधार घेण्यात येणार नव्हता. स्टार एअरनेदेखील नाशिकमधून सिंधुदूर्ग सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली होती; मात्र केारोनाची दुसरी लाट आली आणि सर्वच सेवा अडचणीत आली.
विमान सेवा पूर्णत: बंद नसली तरी प्रत्येक कंपनीला पन्नास टक्केच विमाने सुरू ठेवण्यास परवानगी तसेच वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे आरोग्य नियम यामुळे अडचण निर्माण झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी विस्कळीत स्वरूपात सेवा सुरू आहे; मात्र आता अनलॉक हेाऊ लागल्याने १ जुलैपासून बऱ्यापैकी विमान सेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
कोट..
सध्या ट्रु जेटची नाशिक- अहमदाबाद सेवाच सुरू आहे. अन्य सेवा बंद आहेत; मात्र लवकरच अन्य सेवादेखील सुरळीत हेातील. नाशिकमधून विमान सेवेला वाढणारा प्रतिसाद बघता सिंधुदूर्ग, कोलकाता, सुरत, हिंडन अशा अनेक ठिकाणच्या सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
-मनीष रावळ, उद्योजक.