सारे जहॉँ से अच्छा.. हिंदोस्ता हमारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:24 PM2020-08-18T22:24:34+5:302020-08-19T00:58:22+5:30
नाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
येवला येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात प्रतिष्ठानच्या संचालक सुधा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अमित पटेल, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, शरद श्रीश्रीमाळ, सलिल पाटील, शंकर कुमावत उपस्थित होते. बाबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक केले.
सुखदेव आहेर यांनी आभार मानले. कार्यक्र मास हेमंत पाटील, मंदा पडोळ, संतोष कोकाटे, रेखा दुनबळे, नितीन कदम, रावसाहेब खराटे, रावसाहेब सोनवणे, विजय जाधव, मारूती पगारे, देवीदास पगारे, शोभा कदम आदी उपस्थित होते.अभोण्यात स्वातंत्र्यदिन साजरा
अभोणा : येथील ग्रामपालिकेसह विविध संस्थांमध्ये मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत शारीरिक अंतराचे पालन करत ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपालिकेत प्रशासक इंजि. कांतीलाल चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव, ताराबाई पवार, सोमनाथ सोनवणे, गणपत दुसाने,चंद्रकांत पगारे, मदन करवंदे, विजय देसाई, सुधीर बिरार,विक्रम जाधव, संजय पाटील, नीलेश मुसळे, हिराबाई आहेरराव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. डांग सेवा मंडळाच्या जनता विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव मराठे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नंदकिशोर बधान, हरि सानजे, उमाकांत गायकवाड उपस्थित होते.आरबीएच कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प मालेगाव : येथील आरबीएच कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायात प्राचार्य अलका जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध आॅनलाइन स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्य जोंधळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी मोबाईल हाताळत असताना पालकांनी दक्ष राहावे, असे सांगून पालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.