शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:26 PM2020-06-06T17:26:54+5:302020-06-06T17:38:20+5:30

नाशिक : मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील दुकाने सम विषम तारखांना खुली करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी या नियमावलीचा फज्जा उडाला आहे. महानगरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेने शनिवारी दुपारी तब्बल अडीच महिन्यांनी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. महानगरातील सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वहात होते.

All the markets in the city are open | शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या

शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या

googlenewsNext
ठळक मुद्देसम- विषमच्या नियमाचा फज्जा शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी 

नाशिक : मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील दुकाने सम विषम तारखांना खुली करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी या नियमावलीचा फज्जा उडाला आहे. महानगरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेने शनिवारी दुपारी तब्बल अडीच महिन्यांनी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. महानगरातील सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वहात होते.
पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच्या या शनिवारी नागरिकांनी लॉकडाउन लागण्यापूर्वीच्या दिवसांसारखीच खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांनी प्रामुख्याने किराणा सामान, भाजी, फळे खरेदी त्याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्या, रेनकोट खरेदीलादेखील प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीमध्ये नागरिकांकडून मेनरोडवरील बहुतांश दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली. प्रदीर्घ काळाने नागरिक खरेदीसाठी दुकानांमध्ये आल्याने दुकानदार, मालकांनीदेखील ग्राहकांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्याशी सुसंवाद साधत मालाची विक्री करीत होते. नाशिककरांनी लॉकडाउन काळात अत्यंत प्रभावीपणे पाळला. तसेच दुकानदारांनीदेखील प्रशासनाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनानुसार पूर्णपणे बंद पाळत प्रशासनाला सहकार्य केले. अखेरीस परवापासून दुकाने उघडण्यास प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. शनिवारी उद्योग क्षेत्राला सुटी असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि कुटुंबीयांनी खरेदीसाठी झुंबड केली होती. उद्योग पुन्हा सुरळीतपणे सुरू झाल्याने कामगारांनादेखील आता हळूहळू सारे काही सुरळीत होईल, असे वाटू लागल्याने ग्राहकांची क्रयशक्तीतही सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अन्य गरजेच्या वस्तुंचीदेखील खरेदी केली जात आहे.

Web Title: All the markets in the city are open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.