ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक : बनसोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:23 PM2020-07-29T17:23:29+5:302020-07-29T17:24:09+5:30
निफाड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करणे, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणे, हायरिस्क मधील लोकांचे विलगीकरण करणे, टेस्टिंग वाढविणे, आणि कंटेन्मेंट झोन मधील गस्त कडक करणे याचा अवलंब करावा लागेल त्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस, आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेने हातात हात घालून काम करावे असे आवाहन जिल्ह परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.

निफाड तालुक्यात कोरोनाच्या बाबतीत चालू असलेल्या उपाययोजना, सध्याची परिस्थिती, कोरोना नियंत्रणासाठी यापुढे करायचे प्रयत्न याबाबत निफाड पंचायत समिती सभागृहात प्रशासकीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी बनसोड यांनी आवाहन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाडच्या प्रांत अर्चना पठारे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते.
या बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी तालुक्यातील कोरोना ग्राफची सांख्यिकीय माहिती सादर केली, निफाड पंचायत समतिीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निफाड तालुक्यात चालू असलेल्या सर्व उपाययोजनाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, यतीन कदम, दीपक शिरसाठ, डी. के. जगताप, सिद्धार्थ वनारसे, पंचायत समतिीचे उपसभापती शिवा सुरासे आदींनी सुचना मांडल्या बैठकीला गटशिक्षणाधिकारी के. व्ही. तुंगार, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, ओझर, पिंपळगाव, सायखेडा, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, विस्तार अधिकारी उपस्थित होते.