..आणि दिव्यांग साहीलने घेतली स्वतःच्या पायावर धाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:26 AM2020-12-03T04:26:06+5:302020-12-03T04:26:06+5:30

(जागतिक अपंग दिन विशेष) पेठ : जन्मानंतर आलेले कायमचे अपंगत्व सोबत घेऊन आई व आजीच्या कुशीत वाढणाऱ्या साहीलने दहा ...

..And Divyang Sahil took a run on his own feet! | ..आणि दिव्यांग साहीलने घेतली स्वतःच्या पायावर धाव !

..आणि दिव्यांग साहीलने घेतली स्वतःच्या पायावर धाव !

Next

(जागतिक अपंग दिन विशेष)

पेठ : जन्मानंतर आलेले कायमचे अपंगत्व सोबत घेऊन आई व आजीच्या कुशीत वाढणाऱ्या साहीलने दहा वर्षात विविध शारीरिक, मानसिक, सामाजिक कौशल्य विकास पद्धतीच्या उपचाराद्वारे आपल्या अपंगत्वावर मात केली आहे. आता स्वतःच्या पायावर धाव घेण्याचे सामर्थ्य त्याने मिळवले असून, समग्र शिक्षा अभियानाचे अपंग समावेशित शिक्षण त्याच्यासाठी वरदान ठरले आहे.

सध्या पेठ तालुक्यातील कोटंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथ्या इयत्तेत शिक्षण घेणारा साहील हनुमंत घटके या मुलाला जन्मानंतर मेंदूत ताप गेल्याने अपंगत्व आले. खेळण्या-बागडण्याचे वय असताना बहुविकलांगतेने तो अंथरुणाला खिळून होता. घरात फक्त आई व आजी ह्या दोन्हीच काय ते त्याचा सांभाळ करायच्या. त्यातही आई मोलमजुरीला गेल्यावर वृद्ध आजीवर साहीलची सर्व जबाबदारी येऊन पडायची. कसेबसे तीन वर्ष सांभाळ केल्यानंतर पंचायत समिती शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशित शिक्षणात साहीलची नाव नोंदणी केली. विशेष शिक्षिका लीना महाले यांनी साहीलच्या घरी भेट देऊन आईशी चर्चा केली. गावातील अंगणवाडीत साहीलचे नाव दाखल करून त्यावर होमबेस उपाययोजना सुरू करण्यात आली. प्रारंभी तालुकास्तरीय शिबिरात तपासणी करून त्यास प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले व फिजिओथेरपीसाठी जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात आले. अपंग समावेशित शिक्षणात समाविष्ट असलेले विविध शारीरिक, मानसिक, सामाजिक कौशल्य विकासाच्या पद्धतीद्वारे केलेले उपचार लागू पडत असल्याचे दिसू लागले. त्यानंतर त्यास जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्यात आले. शिक्षक, पालक व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी साहीलला शारीरिक व मानसिक आधार देत त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले.

समावेशित शिक्षण आलिम्कोमार्फत त्यास व्हीलचेअर, सीपी चेअर, वॉकर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. साहील आता चौथीत सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेत आहे. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी सुनीता जाधव यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली व पालकांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विषयतज्ज्ञ हेमंत भोये, सुनंदा सोनार, लीना महाले, पूनम साळुंखे, नितीन पठाडे, शालेय पोषण आहार विभागाच्या तनूजा सदगीर आदी उपस्थित होते.

साहीलच्या जन्मानंतर आलेले अपंगत्व आणि संसारात आलेले संकट यामुळे हिंमत खचली असताना वृद्ध आईने व नंतरच्या काळात शिक्षण विभागाने दिलेली साथ यामुळे अंथरूणात पडून होता. आता तो वॉकरच्या साहाय्याने स्वतःच्या पायावर चालू लागल्याचे समाधान लाभले आहे.

- पुष्पा घटके, आई

===Photopath===

021220\02nsk_29_02122020_13.jpg

===Caption===

कोटंबी (ता. पेठ) येथील बहुविकलांग विद्यार्थी साहील यास प्रात्यक्षिक करून दाखवतांना सुनिता जाधव, लीना महाले, हेमंत भोये, सुनंदा सोनार, पुनम साळूंके आदी.०२ पेठ २

Web Title: ..And Divyang Sahil took a run on his own feet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.