..अन् धुळीपासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:19 PM2020-01-22T22:19:19+5:302020-01-23T00:15:31+5:30
सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्रमाण वाढले होते. परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला होता. लोकमतमध्ये प्रसिद्ध प्रशासनास जाग आली असून, ठेकेदाराने रस्त्यावर पाणी मारण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांची धुळीपासून सुटका झाली आहे.
पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्रमाण वाढले होते. परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला होता. लोकमतमध्ये प्रसिद्ध प्रशासनास जाग आली असून, ठेकेदाराने रस्त्यावर पाणी मारण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांची धुळीपासून सुटका झाली आहे.
या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना कामामुळे उडणाºया धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. धूळ उडू नये व काम जलद गतीने पूर्ण व्हावे तसेच या रस्त्यावर पाणी मारावे यासाठी येथील नागरिकांनी रविवारी (दि. २०) रास्ता रोको केला केला होता. या आंदोलनाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदार जागा झाला व कर्मचाऱ्यांना सूचना करत पाणी मारण्यास सुरुवात केली.
सुरत-शिर्डी राज्य महामार्गाचे दुहेरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र संथ गतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते. परंतु आता रस्त्यावर पाणी मरण्यास प्रारंभ झाल्याने धुळीपासून नागरिकांची सुटका झाली असली तरी उर्वरीत काम तत्काळ मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त काण्यात येत आहे.
या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून किंवा पाठीमागून येणारी वाहने दिसत नाही. याबाबत संबंधित ठेकेदारास वेळोवेळी सांगूनही पाणीदेखील मारले जात नव्हते. त्यामुळे रास्ता रोको केला होता. तसेच ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनास जाग आली आहे. धुळीपासून सुटका झाली असली तरी उर्वरित काम तत्काल मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
- अक्षय विधाते,
वाहनधारक, पिंपळगाव बसवंत