...अन् शिरसगाव लौकीत तब्बल तीन तासांनी मतदानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:30 PM2019-04-29T13:30:44+5:302019-04-29T13:31:35+5:30
लासलगाव : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकि, वळदगाव ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यात यावी या संदर्भातील लौकि गावाचा विभाजनाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असतांना २६ सप्टेंबर २०१८ च्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीवर येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता.
लासलगाव : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकि, वळदगाव ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यात यावी या संदर्भातील लौकि गावाचा विभाजनाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असतांना २६ सप्टेंबर २०१८ च्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीवर येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. लौकि गावातून एकही अर्ज दाखल न करता सामुदायिकरित्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. त्या पाशर््वभूमीवर लोकसभेच्या मतदानासाठी सकाळी येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला.या गावात सुमारे ११०० मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरू होऊनही पहिल्या तीन तासात एकही मतदार दहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला नाही या बाबतची माहिती लासलगावचे जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप ,प्रकाश दायमा,संतोष पलोड, रवींद्र होळकर, राजू राणा,रवींद्र खांडेकर यांनी लौकि गावात जाऊन सरपंच भाऊलाल कानडे, बाळासाहेब कुर्हे, गजानन कानडे, सतीश कानडे, बापू आढाव यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा करून निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर प्रलंबित मागणी संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन देऊन समजूत काढली. त्यांनतर १०.१५ वाजेच्यासुमारास मतदान प्रक्रि या सुरू झाली.