उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथे आंध्र प्रदेशच्या कारागिरांनी बनविलेले बांबूच्या कामट्यांपासून रंगीबेरंगी इको फ्रेंडली आकाशकंदील विक्रीसाठी आणले आहेत. नेहरूनगरच्या भिंतीलगत आंध्र प्रदेशातून आलेल्या कारागिरांनी इको फ्रेंडली आकाशकंदील बनविण्यासाठी बेंगळुरू येथून बांबू व वेताच्या कामट्या आणल्या आहेत. त्यापासून विविध आकारांतील रंगीबेरंगी इको फ्रेंडली आकाशकंदील बनवून ते विक्रीसाठी झाडांना लटकविण्यात आले आहेत. २०० ते ३०० रुपये किमतीचे विविध आकाराचे आकाश कंदील येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राऊंड बॉल, कॅप, अंब्रेला, हाफ राऊंड, ट्रॅँगल असे विविध आकारांचे व पद्धतीचे आकाशकंदीलांसह फ्लॉवर पॉटचेदेखील विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नव्यानेच आलेल्या इको फ्रेंडली आकाशकंदील घेण्यासाठी महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी होत आहे. (वार्ताहर)
आंध्र प्रदेशचे आकाशकंदील नाशकात
By admin | Published: October 14, 2016 12:25 AM