नाशिक : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट २१ ते ३० ऐवजी २१ ते ४० करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अनिल आहेर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात आहेर यांनी म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. सदर आदेशात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदावर सरळसेवा नियुक्तीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविका २४१ मदतनीस ९६४ मिनी अंगणवाडी सेविका २३ असे एकूण १२२८ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यात ही पदे भरण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. सदर भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करावी व शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी अश्विनी आहेर यांनी केली आहे. मंत्री महोदयांना त्यांनी या सर्व मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्त्या महिलांचे वयोमान ३० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. ३० वर्षे वयोमर्यादेच्या अटी-शर्तीमुळे स्थानिक महिला सरळेसवा भरतीच्या वेळी अपात्र होतात व नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. त्यामुळे भरतीत त्यांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी ग्रामीण भागातील विधवा, परित्यक्ता महिलांची मागणी आहे.
अंगणवाडीसेविका भरतीला वयाच्या अटीमुळे खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 1:44 AM
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट २१ ते ३० ऐवजी २१ ते ४० करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अनिल आहेर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देवय वाढवा : सभापतींचे महिला बालकल्याणमंत्र्यांना साकडे