अंगणवाडी सेविकांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:26 AM2020-12-03T04:26:19+5:302020-12-03T04:26:19+5:30
त्र्यंबकेश्वर : ‘ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी फक्त एक धाव पाण्यासाठी’ हे ब्रीद घेऊन जलपरिषदेने ‘मिशन जलपरिषदअंतर्गत १०१ ...
त्र्यंबकेश्वर : ‘ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी फक्त एक धाव पाण्यासाठी’ हे ब्रीद घेऊन जलपरिषदेने ‘मिशन जलपरिषदअंतर्गत १०१ वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला विविध भागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून, दिवसेंदिवस वनराई बंधाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
---------
अंगणवाडी सेविकांनी बांधला वनराई
तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हरसूलच्या माध्यमातून शिरसगाव बिटातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवित वनराई बंधारा बांधून बंधाऱ्यातील जलपूजनही केले. पाण्याचे महत्त्व आणि निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरवळ येथील अंगणवाडी सेविकांनी जलपरिषद मिशनमध्ये सहभाग नोंदवत वनराई बंधारा बांधला आहे. खरवळ येथे ग्रामपंचायत, कृषी विभाग तसेच अंगणवाडी सेविकांनी बोकडभुजीच्या ओहळात दोन बंधारे बांधल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी हरसूल सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी सागर वाघ,विस्तार अधिकारी संदीप चौधरी, पर्यवेक्षक भारती भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका कौशल्या धूम, सुगंधा गावीत, मदतनीस रखमाबाई गावीत, विमल मौळे, लता मौळे, लक्ष्मी गावीत, मंगल वळवी, हर्षदा भोये, संगीता भोये, राहुल गावीत, गणेश वळवी, हिराबाई गावीत, पुंडलिक गावीत, जलपरिषदचे पोपट महाले,अनिल बोरसे आदी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत, कृषी विभाग, जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यास सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक देवीदास भोये यांनी भेट देत कौतुक केले. सरपंच मंदा मौळे, विठ्ठल मौळे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, कृषी मंडल अधिकारी अनिल गावीत, कृषी पर्यवेक्षक व्ही. एच. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक पी. एस. दिघे, जे. एम. गायकवाड, नारायण मौळे, श्याम जाधव, रमेश मौळे, दत्तू मौळे, गंगूबाई वाघेरे आदी उपस्थित होते.
-----------------
खरवळ येथील बोकडभुजी ओहळात बंधारा बांधून जलपूजन करताना अंगणवाडी सेविका. समवेत पोपट महाले, अनिल बोरसे आदी. (०२ टीबीके २)
===Photopath===
021220\02nsk_3_02122020_13.jpg
===Caption===
(०२ टीबीके २)