नाशिक : नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आगाऊ नोटीस देण्यासाठी नियोजित वधू-वराला दुय्यम निबंधक कार्यालयात माराव्या लागणाºया चकरा आता थांबणार असून, येत्या १ एप्रिलपासून मुद्रांक व नोंदणी विभागाने विवाह नोंदणीसाठी आॅनलाइन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली आहे. शुक्रवारी कवडे यांनी नाशिक विभागातील मुद्रांक अधिकारी व सहाय्यक दुय्यम निबंधकांची आढावा बैठक घेतली. त्यात मुद्रांक विभागाने नागरिकांना आॅनलाइन सुरू केलेल्या विविध सुविधांची माहिती सादर केली.
अनिल कवडे : मुद्रांक विभाग देशात अव्वल; कार्यालयाच्या चकरा थांबणार १ एप्रिलपासून विवाह नोंदणी आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:25 AM