इगतपुरी : गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अनिल रणशूर तर उपसरपंचपदी शांताराम कांगणे यांची निवड करण्यात आली. गोंदेगाव ग्रामपंचायत झालेल्या निवडणुकीत गोंदेश्वर विकास पॅनलला सहा जागा जिंकूनही आरक्षणाच्या आधारे गोंदेश्वर परिवर्तन पॅनलचे अनिल रणशूर यांची बिनविरोध निवड, तर गोंदेश्वर विकासचे उपसरपंचपदी शांताराम कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी सुचक कुसुमबाई भोसले तर उपसरपंचपदी सूचक प्रवीण नाईक म्हणून काम पाहिले. यावेळी सदस्य विमल साळवे, सुरेश बर्डे, प्रतिभा कांगणे, दिलशान शेख, मुक्ताबाई कांगणे, दत्तू पा. साळवे, भाऊसाहेब कांगणे, महेश मेथे, रावबा साळवे, रज्जाक पठाण, शशी रणशूर, पोपट मोरे, अशोकराव भोसले, प्रमोद नाईक, साहेबराव कांगणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.