येवला तालुक्यात पशू लसीकरण मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:58+5:302021-08-21T04:18:58+5:30
तालुक्यातील आडगाव रेपाळ येथून लसीकरण मोहिमेला सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते सुरुवात झाली. जनावराच्या अंगावर गाठ येणे, जनावरास ताप ...
तालुक्यातील आडगाव रेपाळ येथून लसीकरण मोहिमेला सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते सुरुवात झाली. जनावराच्या अंगावर गाठ येणे, जनावरास ताप येणे, गाठीमध्ये पस तयार होणे अशी लक्षणे दिसून येतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने एका जनावरांकडून दुसऱ्या जनवारास होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरता ज्या जनावरांना हा आजार झाला त्या जनावरांना इतर जनावरांपासून बाजूला ठेवावे, अशा सूचना तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जामदार यांनी या वेळी बोलताना केल्या.
सभापती गायकवाड यांनी, ग्रामीण भागातल्या जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सभापती कार्यालय नेहमी आपल्या सेवेत आहे. आपले कुठलेही काम असले तरी हक्काने या, असे आवाहन या वेळी बोलताना केले. घरकुल, शिधापत्रिका, जात दाखले, सभापती आपल्या दारी या उपक्रम व मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्यांची कामे झाली, असे सरपंच तुकाराम गुंजाळ यांनी बोलताना सांगितले.
कार्यक्रमास उपसरपंच बाबासाहेब महाले, शिवाजी निकम, गोरख जगताप, सुरेश बागुल, ज्ञानेश्वर बागुल, नारायण गुंजाळ, नंदू झांबरे, दत्तू गायके, शिवाजी निकम, ज्ञानेश्वर बागुल, संजय तनपुरे, कविता पवार, रेखा जगताप, सुरेश बागुल, रमेश निकम, भास्कर गुंजाळ, रावसाहेब मढे, निवृत्ती ठोंबरे, शंकर गायके, पोपट पवार, श्रीहरी जिरे, पांडुरंग गायके, सुरेश बढे, गोरख गायके, ज्ञानेश्वर तनपुरे, ग्रामसेवक कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(२० येवला ४)
200821\20nsk_22_20082021_13.jpg
२० येवला ४