साने गुरुजी शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:03 AM2017-11-27T00:03:56+5:302017-11-27T00:36:38+5:30
धर्मदाय संस्था व चॅरिटीसाठी झटणारे अनेक आहेत. मात्र संस्था चालवणे हे एक समूहाचे काम असून, साने गुरुजी शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा सर्वांनी यापुढे असाच चालवावा, असे प्रतिपादन इंडस्ट्री आणि लेबर कोर्टाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शशिकांत सावळे यांनी केले.
नाशिकरोड : धर्मदाय संस्था व चॅरिटीसाठी झटणारे अनेक आहेत. मात्र संस्था चालवणे हे एक समूहाचे काम असून, साने गुरुजी शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा सर्वांनी यापुढे असाच चालवावा, असे प्रतिपादन इंडस्ट्री आणि लेबर कोर्टाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शशिकांत सावळे यांनी केले. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा ५६ व वर्धापनदिन के. जे. मेहता शाळेच्या शोभेंदू सभागृहात शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती शशिकांत सावळे बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ, सेक्रेटरी प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, विश्वस्त अनिल अरिंगळे, डॉ. भूषण कानवडे, संस्थेच्या शिक्षणाधिकारी मंगला कानवडे, मुंबई महाविद्यालयाचे अशोक गवारे, आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळीे साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या संस्थापकांनी लावलेल्या रोपट्याचा हा वटवृक्ष सांभाळताना अभिमान वाटतो आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रवीण जोशी यांनी केले. तर अध्यक्ष पदावरून गणपतराव मुठाळ यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये देणगीदार, शिक्षक व विद्यार्थी यांचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेत वर्षभर राबवलेल्या उपक्र मात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य अशोक अरिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी दापोरकर व आभार एस. एस. शिंदे यांनी मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.