दर घसरल्याने शेतकऱ्यांत संताप
नाशिक : कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादनाचा खर्च वाढला आहे; मात्र भाव मिळत नसल्याने कांदा पिकवावा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
पेन्शनधारकांची बँकांमध्ये गर्दी
नाशिक : कोरोनाचे संकट वाढले असले तरी शहरातील विविध बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे. अनेक बँकांनी ऑनलाइन व्यवहार सुरू केले असले तरी पेन्शनधारकांना बँकेत जावे लागत असल्याने महिन्याच्या सुरुवातील अनेक बँकांमध्ये गर्दी होते.
खाद्यपदार्थ विक्रेते पुन्हा अडचणीत
नाशिक : हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणारे अनेक विक्रेते बंदमुळे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षापासून या विक्रेत्यांची ग्राहक कमी झाली ीआहे. दरवाढ करूनही पुरेसा व्यवसाय होत नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हॉटेलांना वस्तू पुरविणारे अडचणीत
नाशिक : बंदमुळे हॉटेलांना विविध वस्तूंचा आणि भाजीपाला पुरविणारे छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बंदमुळे या व्यावसायिकांच्या अर्थचक्राला खीळ बसली आहे. आता अतिरिक्त भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.
उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हामुळे विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उन्हाळी पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: मळे परिसरात राहाणाऱ्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
डिस्टन्सिंगचा फज्जा
नाशिक : बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. बऱ्याच ठिकाणी अनावश्यक नागरिकांची गर्दी होत असते. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा होतो. अनावश्यक लोकांना आवारात प्रवेश देणे टाळावे, असे शेतकरी, व्यापारी यांनी म्हटले आहे.