निवडणूक प्रक्रि येविरु द्ध न्यायालयात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:24 AM2018-02-24T00:24:59+5:302018-02-24T00:24:59+5:30
तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी तयार केलेल्या मतदार याद्या सदोष असण्याबरोबरच प्रत्येक मतदाराला पंधरा गणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
सटाणा : तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी तयार केलेल्या मतदार याद्या सदोष असण्याबरोबरच प्रत्येक मतदाराला पंधरा गणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रथमच शेतकरी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या आदेशान्वये जिल्हाधिकाºयांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या सदोष आहेत. तसेच मतदार याद्या तयार नसताना गणरचना जाहीर करता येते का? व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पंधरा गणांमधील प्रत्येक मतदाराला पंधराच्या पंधरा उमेदवारांना मतदानाचा हक्क मिळावा या मुद्द्यांवर चर्चा करून दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी माजी आमदार संजय चव्हाण, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, यशवंत अहिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात इच्छुकांची बैठक आयोजित केली होती.
खर्च कोण करणार?
निवडणूक प्रक्रि येविरु द्ध न्यायालयात जाण्यासाठी आर्थिक खर्च कोण करणार, असा सवाल बैठकीत उपस्थित झाला. यावेळी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रत्येकी पाच हजार रु पये जमा करावेत, अशी सूचना मांडली. त्याला समको बँकेचे माजी अध्यक्ष शरद सोनवणे यांनी तत्काळ पाच हजार रु पये जमा करून सकारात्मक प्रतिसाद दिला असता, दुसरीकडे मात्र पॅनलचे नेते होऊ पाहणाºया काही मंडळीने अर्थकारण पुढे येत असल्याचे पाहून चक्क बैठकीतूनच काढता पाय घेतला.