इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 06:39 PM2021-03-06T18:39:16+5:302021-03-06T18:39:43+5:30

सुरगाणा : शासनाने बालकांचे मोफत शिक्षण व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इंग्रजी माध्यमांच्या खाजगी संस्थेच्या शाळेत मोफत प्रवेश ...

Appeal for free admission to English medium school | इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन

googlenewsNext

सुरगाणा : शासनाने बालकांचे मोफत शिक्षण व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इंग्रजी माध्यमांच्या खाजगी संस्थेच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे यांनी दिली आहे.
                            आरटीई नुसार तालुक्यातील शासनमान्य इंग्रजी माध्यमांच्या कायम विनाअनुदानीत, विनाअनुदानीत व स्वंय्अर्थ सहायित शाळेत इयता पहिलीच्या वर्गात एकूण विद्यार्थी जागांच्या पंचवीस टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत प्रवेशाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहे.
                              सदर जागेवर प्रवेश घेण्यासाठी शासन परिपत्रका नुसार ३ मार्च २०२१ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये तालुक्यातील गिरजादेवी इंग्लिश स्कूल सुरगाणा, निर्मलाताई इंग्लिश स्कूल डोल्हारे, कॉ. लक्ष्मीबाई इंग्लिश स्कूल उंबरपाडा (सु) या शाळांचा समावेश आहे.

                       या शाळेत पहिल्या इयत्तेत प्रवेश उपलब्ध आहेत. पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरीता https://rte25admission. maharashtra.gov.in किंवा https://student.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: Appeal for free admission to English medium school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.