नाशिक : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबीई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या परीक्षांच्या गुणवतेविषयी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सांशकता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ऑफलाइन परीक्षाचा खर्च ऑनलाइनपेक्षाही ५ पटीने जास्त असतो. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे.
विद्यापीठाने याविषयी विचार करण्याची गरज असून कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट असताना त्यांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी आणि उर्वरित रकमेचा विद्यार्थ्यांना परतावा करावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र कार्यालयातील समन्वयक डाॅ. प्रशांत टोपे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. छात्रभारती नाशिकचे उपाध्यक्ष देवीदास हजारे, शहर संघटक आशिष कळमकर तसेच रोहन पगारे उपस्थित होते.