सुरगाणा : नगरपंचायत नगरसेवकांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व १७ नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, येत्या जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी विकास मीना यांची सुरगाणा नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक पार पडून नगराध्यक्ष निवड होईपर्यंत ते कार्यभार सांभाळतील.सुरगाणा ग्रामपंचायतीचे सतरा प्रभाग निर्माण झालेल्या नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. प्रभागानुसार आरक्षण जाहीर झालेली आहे. आरक्षण व प्रभागरचनेवर हरकतीची मुदतही २६ नोव्हेंबर रोजी संपली आहे. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक पार पडून नवीन नगरसेवकांच्या पहिल्या बैठकीपर्यंत नगरपंचायतचा कार्यभार प्रशासक म्हणून विकास मीना पाहणार आहेत.सुरगाणा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१चा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत शहरातील सर्व १७ प्रभागात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवक व नवीन इच्छुकांनी आपले नशीब अजमावण्याची तयारी सुरू केली आहे.
सुरगाणा नगरपंचायत प्रशासक म्हणून प्रांत मीना यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 10:57 PM
सुरगाणा : नगरपंचायत नगरसेवकांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसुरगाणा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१चा बिगुल वाजला