ओट्यावरच्या शाळेचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:57+5:302021-07-12T04:09:57+5:30

ओझरटाऊनशिप : बाणगंगानगर (ओझर) येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतर्फे सुरू असलेल्या ‘ओट्यावरची शाळा’ उपक्रमाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी कौतुक ...

Appreciation from the education officials of the school at Otya | ओट्यावरच्या शाळेचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक

ओट्यावरच्या शाळेचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक

googlenewsNext

ओझरटाऊनशिप : बाणगंगानगर (ओझर) येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतर्फे सुरू असलेल्या ‘ओट्यावरची शाळा’ उपक्रमाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी कौतुक केले आहे. बोलक्या बाहुल्यांद्वारे अध्यापन करणाऱ्या नलिनी बन्सीलाल आहिरे आणि मुख्याध्यापक संजय पवार यांनी शाळेमध्ये कोरोना काळात सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. शाळा जरी बंद असल्या तरीसुद्धा बाणगंगानगर शाळेमधील सर्व विद्यार्थी कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क लावून सामाजिक अंतर ठेवून समाज मंदिरात अभ्यासासाठी बसतात. विविध शैक्षणिक साहित्य बघितल्यानंतर म्हसकर यांनी शिक्षकांच्या कामकाजाचीही पाहणी केली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी हितगूज केले. यावेळी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. चौधरी, केशव तुंगार, नूतन पवार, राजेंद्र बागुल उपस्थित होते.

Web Title: Appreciation from the education officials of the school at Otya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.