आर्दा नक्षत्राने बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 07:24 PM2020-06-30T19:24:47+5:302020-06-30T22:49:18+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील जळगाव नेऊर, पुरणगाव, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, परिसरात मृग नक्षत्रात शेतकर्यांनी पेरणी केली होती, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, पण गेली चार पाच दिवसांपासून आद्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे,
लोकमत न्युज नेटवर्क

दि. २७, २८, २९ ला अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अचानक झालेल्या तापमान वाढीनंतर खिरपाच्या पेरण्या धोक्यात आल्याचे दिसून येत होते. मात्र शनिवार, रविवार, तर सोमवारी चार वाजता व रात्री आठ वाजेच्या दरम्यान जळगाव नेऊर, शेवगे सातारे, पिंपळगाव लेप, जऊळके, मुखेड फाटा आदी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.
मागील तिन दिवसांपासून सातत्याने दररोज सरी कोसळत असल्याने अजून दोन तीन पाऊस झाल्यास भूजल पातळीचे प्रमाण वाढणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. दरम्यान काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकरी पिकांच्या नुकसानीची भीती देखील व्यक्त करत आहे,
विशेषता कोवळ्या अवस्थेतील मका, बाजरी तसेच ज्यांनी लाल कांद्याची रोपे टाकलेली त्यांना या पावसाचा फटका बसणार आहे. काही ठिकाणी पावसाने शेतातील कांदा रोपे वाहिल्याचे प्रकार घडले आहे.
प्रतिक्रि या...
मृग नक्षत्रात पेरणी केल्यावर मध्यांतर पाच-सहा दिवस खÞंड पडल्याने पिके धोक्यात आली होती पण आर्दा नक्षत्रात चाÞंगला पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
- साईनाथ गचाले, शेतकरी, सातारे.
(फोटो ३० जळगावनेउर)
येवला तालुक्यातील शेवगे येथे सोमवारी झालेल्या पावसाने शेतात साचलेले पाणी.