येवला : येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे.शालेय जीवनापासून तर आतापर्यंत कोकाटे यांनी राष्ट्र सेवा दल, शेतकरी पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभा, महिला व युवकांसाठी कार्य केलेले आहे. कोकाटे यांच्या निवडीने राष्ट्र सेवा दल देशभर एक नवीन उभारी घेऊन राज्यात सेवा दलाचा पाया अधिक मजबूत होईल व राज्यात सेवा दल अधिक गतीने काम राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.कोकाटे यांनी तालुक्यातील साताळी या एका छोट्या खेडेगावातुन आपल्या कामाची सुरूवात करून डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, मेधाताई पाटकर यांच्या आंदोलनात त्यांचा आघाडीचा कार्यकर्ता म्हणून सहभाग राहिला आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतरणासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्ण-बधिर मुलांसाठी निवासी शाळाही ते चालवतात.
राष्ट्र सेवा दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्जुन कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 1:26 AM
येवला येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे.
ठळक मुद्देबहुमताने निवड : पुणे येथे झाली निवडणूक